★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
शिक्षक मित्रांनो विविध खेळातून अध्यापन केल्यास अध्यापन प्रभावी होते.पण असे शैक्षणिक खेळ कसे निर्माण करावे असा प्रश्न नेहमी आपणास पडत असतो.आपल्यापैकी भरपूर शिक्षकांनी विविध खेळांचा निर्माण केलेला आहे परंतु ते खेळ अपणापर्यंत पोहचत नाही.असेच काही निवडक शैक्षणिक खेळाचे संकलन मी केले आहे ते आपणासाठी प्रस्तुत करत आहे.
ओळखा पाहू शब्द
विद्यार्थ्यांना दोन किंवा अधिक संघात विभागुण घ्या .संघातील एखाद्या एक विद्यार्थ्याला समोर यायला सांगा .त्या विद्यार्थ्याला कुठलाही एक शब्द द्या .तो विद्यार्थी शब्द किंवा वाक्य वापरून तिच्या संघास शब्द सुचवेल , विद्यार्थी त्या शब्दाविषयी काहीपण कृती करू शकतो परंतु प्रत्यक्ष शब्दाचा कोणताही भाग किंवा प्रकार वापरू शकत नाही. संघातील विद्यार्थ्यांना तो शब्द ओळखायाचा आहे. बरोबर उत्तरास एक गुण द्या.
आपली जोडी शोधा
सर्व प्रथम आपणास भरपूर शब्द पाट्या तयार करावी लागेल उदा.समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,गणितातील सूत्र,बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,रंगाची नावे,इत्यादी शब्द पट्ट्या बनवा.सर्व पट्ट्या विद्यार्थ्यास वाटा.
मुलांना त्यांची जोडी ओळखण्यास सांगा,
मी इंग्रजी शिकणार
सर्व प्रथम मुलांचे गट बनवा.मुलाना एक फुल स्केप पेपर द्या.खाली काही उदाहरणे दिली आहेत त्या प्रमाणे आपण हा खेळ घेवू शकता.जो गट सर्व प्रथम जास्तीत जास्त शब्द बनवेल तो गट विजयी होईल .ह्या ठिकाणी लक्ष्यात ठेवा कि मुलांना पुस्तक बघण्याची संधी द्या.
उदा.
➤इंग्रजी -a,e, i ,o, u,या स्वराने सुरू होणारे words.शोधा
➤ll ,ff ,ay ,ly, ow ,ew ,ue, ck ,in, ut, pt, ght ,est , ful ,st ,er , y ,es, sh , ess, th ,in at ने शेवट होणारे words.शोधा
➤st ,sm ,sn ,cl ,sch ,ps ,kn इत्यादी पासून सुरू होणारे words.शोधा.
टोपलीतील खजिना
ह्या खेळासाठी आपणास एका टोपलीची आवश्यकता.ह्या टोपली मध्ये आपण विविध शब्द पाट्या टाका जसे कि राजधान्या, नद्या, पर्वत, शिखरे,खनिजे, देश,अभयारण्य, धातू,पर्यटन स्थळे, वनस्पती, प्राणी, धरणे,इत्यादी.आता मुलांचे गट तयार करा.टोपली सर्व समोर टेबलावर ठेवा.प्रत्येक गटातील एक मुलाना समोर बोलावा.मग त्यांना वरील दिलेल्या उदाहरण पैकी एक विषय द्या.जसे कि पर्वताची नावे शोधा ?.आता मुले पर्वताची नावे शोधायला लागतील.जो गट सर्व प्रथम जास्त पर्वताचे नावे शोधेल तो गट विजयी ठरेल.असाच खेळ इतर विषय देवून वर्गात घेवू शकता.
हा खेळ वैयक्तिक तसेच संघात खेळला जाऊ शकतो.सर्व प्रथम मुलांना A पासून सर्व बाराखडी म्हणण्यास सांगायची आणि तोपर्यंत सांगायची जो पर्यंत आपण STOP म्हनणार नाहीत.stop म्हटल्यानंतर जो letter आला असेल त्या लिटर पासून मुलांना विविध प्रश्न विचारायचे जसे की D शब्द आला असेल तर - द पासून सुरू होणाऱ्या वर्गातील कुठल्याही वास्तू चे नाव सांगा.आपण असे भरपूर विषय घेऊ शकता
BANKRUPT OR DONATION
ह्या खेळासाठी आवश्यक आहे ते फ्लॅश कार्ड्स आपण कोणत्याही शब्दसंग्रह किंवा व्याकरण संरचना ह्या ठिकाणी वापरू शकता . खेळला दिवाळखोर म्हणतात. प्रत्येक फ्लॅश कार्ड ची एक किंमत ठरावा ही किंमत मुलाना अजिबात सांगायची नाही ही किंमत फळ्यावर लिहा व त्या वर बोर्ड चिकटवा. वर्ग दोन गटांमध्ये विभाजित करा. प्रत्येक गटातील विद्यार्थीना आपल्यास पसंत केल्याप्रमाणे फ्लॅशकार्ड्सपैकी एक निवडण्यास सांगा.निवडलेल्या कार्ड वर जे काही शब्द किंवा संकल्पना लिहिली असेल त्यावर आधारित त्या गटातील मुलांना प्रश्न विचारा.गटातील मुलांच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर किंवा चूक दिली तर फ्लॅश कार्ड हटवा.मागील बाजूस किंमत लिहिली असेल ती त्यांना सांगा.उत्तर बरोबर असल्यास ती सर्व पैसे गटाला मिळतील .जर उत्तर चुकले असतील तर विरुद्ध असलेला गट bankrupt किंवा donation म्हणले.
Bankrupt म्हणजे 0 पैसे आणि donation म्हणजे हरणारा किंवा चुकीचे उत्तर देणारा गट ते सर्व पैसे दुसऱ्या गटात donet करेल.
सदर खेल आपण पाठ शिकवून झाल्यास प्रश्नांची उत्तरासाठी खेळू शकतो.
दिशा-निर्देश
हा खेळ मुलांना नकाशा तसेच नकाशात दिशेचे ज्ञान होण्यास मदत होईल.ह्या साठी सर्व प्रथम शिक्षकांनी स्वत:च्या घरापुसून ते शाळेपर्यंत च्या नकाशा काढून आणायचा .त्या नकाशामध्ये स्पष्टपने डावीकडे वळा, उजवी कडे वळा, असा उल्लेख असला पाहिजे. हा नकाशा बोर्ड वर लावा व मुलांना समजावून सांगा नंतर सर्व मुलांना स्वतःचा नकाशा काढायला सांगा.जो मुलगा अतिशय चांगला नकाशा काढेल त्यास बक्षिसे द्या.
माझी चूक ओळखा
हा खेळ खेळणासाठी आपणास गटाची आवश्यकता भासेल.आपण हवे असतील तेवढे गट तयार करा गट हा वर्गातील विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे.
फळ्यावर एक वाक्य लिहा पण लक्ष्यात ठेवा की या वाक्यात कुठल्याही प्रकारचे तीन ते चार चूक असणे आवश्यक आहे.वाक्य हे पुस्तकात असेल तर उत्तम. प्रत्येक गटासाठी समान संधी द्यावी.एखाद्या गटाने चूक न शोधल्यास पुढील गटास संधी द्यावी व बोनस गुण द्यावा.हा खेळ इतर विषयासाठीपन खेळला जाऊ शकतो.आपापल्या कल्पना वापराव्या.
माझ्या मनात बसलय कोण?
हा एक वर्णनात्मक खेळ आहे "मी काही पाहत आहे ......................." असे म्हणत प्रारंभ करा आणि वर्गातील कुठल्याही वस्तू, रंग,आकार आणि स्थानाचे वर्णन करा.विद्यार्थ्यास अंदाज लावण्यास सांगा.आशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून विविध शब्दांची ओळख करून घेऊ शकतो.हा खेळ गटात खेळण्यास उत्तम.
मला हे आवडत , मला हे आवडत नाही
ह्या खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या आवडी व नापसंती विषयी जाणून घेऊ शकतो.ह्यासाठी आपण तीन ते चार विद्यार्थ्यांचे गट तयार करून घ्या.आपणास हवे असेल तेवढे गट तयार करा.प्रत्येक गटातिल एक विद्यार्थ्यास गट प्रमुख बनवा.
मी रंग कशाचा?
हा खेळ रंगाची ओळख पटवून देण्यासाठी उपयुक्त आहे.सर्व प्रथम वर्गातील सर्व वस्तूंची यादी बनवा व त्यांचा रंग कुठला आहे हे लक्ष्यात ठेवा.नंतर फळ्यावर रंगाचे नाव लिहा व विद्यार्थ्यास त्या रंगाची वस्तू शोधण्यास सांगा.हा खेळ आपण गटात खेळू शकतो.वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करा व गटातील विद्यार्थीस नियम समजावून सांगा व प्रत्येक गटातील एका विद्यार्थीस फळ्यावर रंगाचे नाव लिहिण्यास सांगा.पुढील गट वस्तूचे नाव शोधले. गुणदान करा.खेळला मजेशीर बनवा.
माझे विमान पकडा
सर्व प्रथम प्रत्येक विद्यार्थ्यास समोर बोलावून स्वतः बद्दल कुठल्याही 3 तथ्या विषयी बोलण्यास सांगा व सर्व विद्यार्थीस शांतपणे ऐकण्यास सांगा.नंतर सर्व विद्यार्थ्यास त्यांनी सांगितले 3 तथ्ये एक वहीच्या कागदावर लिहिण्यास सांगा.लिहिलेल्या कागदाचे विमान बनवण्यास सांगा. सर्व विमाने गोळा करा.सर्व विद्यार्थ्यांना एक मोठ्या वर्तुळात उभे राहण्यास सांगा.सर्व विमाने मध्यभागी ठेवा.आता कुठल्याही एक विद्यार्थ्यास समोर बोलावून एक विमान उचलायला सांगा व उडवण्यास सांगा.विमान ज्या विद्यार्थ्यांच्या जवळपास पडेल त्याला ते उचलायला सांगा व वाचण्यास सांगा.नंतर त्या विद्यार्थ्याला हे कुणी लिहिले असेल अंदाज लावायला सांगा.
आशा प्रकारे आपण हसत खेळत एकमेका विषयी जाणून घेऊ शकतो.
वरील सर्व खेळ PDF मध्ये हवे असल्यास खाली क्लीक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
वर्गातील पहिल्या दिवशी खेळायची शैक्षणिक खेळ PDF
ICE BREAKER GAMES FOR PRIMARY SCHOOL ( 1ST TO 8TH ) PDF ONLY
मराठी उपक्रमासाठी खाली क्लीक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपले अमूल्य मार्गदर्शन माझे ध्येय साध्य करेल तरी कृपया आपल्या शंका,सल्ले, मार्गदर्शन तसेच फीडबॅक खलील comment box मध्ये द्यायला विसरू नका.