टार्गेट शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ - २३ सराव प्रश्न पत्रिका पेपर १ व २ ची संपूर्ण तयारी
मागील वर्ष प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ - २३ ची तयारी करून घेणार आहोत. आम्ही आपणास विविध विषयाच्या घटकावर सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहोत . आपणास त्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायच्या आहेत व विद्यार्थ्यास सोडवायला द्यायच्या आहेत. सर्व सराव प्रश्नपत्रिका Pdf फॉरमॅट मध्ये असून आपण त्याची प्रिंट काढू शकणार आहेत. तसेच आह्मी ह्या सर्व प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत.
टार्गेट शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ - २३ सराव प्रश्न पत्रिका पेपर १ व २ ची संपूर्ण तयारी : आमची वैशिष्ट्ये
- दररोज एक PDF प्रश्न पत्रिका उपलब्ध होईल.
- पेपर १ व पेपर २ साठी विविध विषयाच्या घटकनिहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जातील.
- फक्त इ.५वी च्या शिष्यवृत्ती सराव प्रश्न पत्रिका उपलब्ध होतील.
- सराव प्रश्नपत्रिका ह्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील.
- सराव प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात असतील आपण त्या डाउनलोड करू शकणार आहेत.
- सराव प्रश्नपत्रिका क्रमाने २० गुण ,५० गुण तसेच १५० गुणांच्या असतील.
- मागील वर्ष्याच्या उपक्रमाच्या १०० सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या आहेत.