-
This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
शिक्षकासाठी महत्वाची संकेत स्थळे
जागतिक मराठी भाषा दिवस- २७ फेब्रुवारी संपूर्ण माहिती


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।।
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ।।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।
आज मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी असे बोलताना उर अभिमानाने भरुन येतोय. तसं पाहिलं, तर मराठी भाषेला खूप प्राचीन असा इतिहास आणि अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. अगदी १२ व्या शतकातील महानुभाव संप्रदायाच्या उदयापासून या परंपरेची सुरुवात होते. मग म्हाइंभटांनी लिहिलेले ‘लीळाचरित्र’ असो, किंवा मग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ असो, मराठी साहित्य नेहमीच समृद्ध राहिले आहे आणि तीच समृद्धता आजही टिकुन आहे.
काळानुरुप मराठी बोलीभाषेत बदल होत गेले. साधारणतः १२ व्या शतकापासून अभिजात मराठीचा उदय झाला, असे मानले जात असले तरी मराठीचा इतिहास इ.स.पूर्व काळापर्यंत जाऊन पोहोचतो, तसे ऐतिहासिक दस्तऐवजही संशोधकांना मिळाले आहेत.


▶️ मराठी भाषण pdf
▶️ मराठी भाषण pdf
▶️ मराठी भाषण pdf
▶️ मराठी भाषण pdf
▶️ मराठी भाषण pdf
▶️ मराठी भाषण pdf
नंतरच्या आधुनिक काळात अनेक प्रकारच्या चळवळी या मायमराठीने अनुभवल्या. मग ती स्वातंत्र्यलढ्याची चळवळ असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो. मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर करुन महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्रस्थापितांचे जुलूमी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशभक्तीपर, चिथावणीखोर लिखाण करुन जनजागृती व क्रांती घडवण्याचे कार्य केले. मग त्यामध्ये ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते ज्यांनी “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?” असं सरकारला ठणकावून विचारण्याचं धारिष्ट्य दाखवलं, तर दुसरीकडे जहालमतवादी स्वातंत्र्यवीर सावरकर होते ज्यांनी “सागरा, प्राण तळमळला” हे ह्रदयद्रावक काव्य रचून काळजाचा ठोका चुकवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही अनेक क्रांतिकारकांनी विविध मुखपत्रं, वृत्तपत्रं, पत्रकांच्या माध्यमातून सरकारविरोधी असंतोष तत्कालिन समाजमनात खोलवर रुजवण्याचे मोलाचे कार्य केले ज्याचा परिपाक शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यात झाला.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषेमध्ये खूपच सकारात्मक बदल झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्रास स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा प्राप्त झाला. नावाप्रमाणेच महा असलेले हे राज्य वैविध्येतही मोठे होते परंतु तरीदेखील मराठी भाषेने सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र जोडुन ठेवले, म्हणुनच मराठी भाषिकांचा प्रांत म्हणुन महाराष्ट्र राज्य ओळखले जाऊ लागले.
स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्यात आमूलाग्र बदल झाले, किंबहुना एक चळवळच सुरु झाली जी आजतागायत सुरु आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही.


पुरातन काळात प्रामुख्याने केवळ अध्यात्माभोवती फिरणारे मराठी साहित्याचे स्वरुप काळानुरुप बदलत गेले. २० व्या शतकाच्या अखेरीस जगभर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर आपल्या मराठीनेही कात टाकली. साहित्यात वैविध्य येऊ लागले. कथा, कादंबरी, ललित, कविता, चित्रपट गीते, विनोदी कथा, बालकथा इ. अशा अनेक रुपात मराठीमध्ये विपुल लेखन केले गेले.
मराठी साहित्यात केवळ सांस्कृतिक व अध्यात्मिक लेखन केले गेले असे नाही तर गणित, विज्ञानादि शास्त्रीय विषयांवरही विस्तृत लिखाण व संशोधन झाले आहे. आर्यभट्टांसारख्या तज्ज्ञांनी प्रतिकूल परिस्थितीत गणित व विज्ञानावर प्राचीन काळात संशोधन केले. आजच्या आधुनिक काळात जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर यांसारख्या अनेक विद्वानांनी ही घौडदौड कायम ठेवली आहे.
२०२० पर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या आपल्या भारत देशात गेल्या दोन दशकात प्रचंड राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी घडल्या ज्याने समाजात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडले, मग त्याला मराठी भाषा तरी कशी अपवाद राहील बरं ?
जागतिकीकरणाचा प्रचंड वाढलेला वेग, तंत्रज्ञानाला मिळालेली कल्पकतेची जोड, प्रचंड वेगाने होऊ शकणारी माहितीची देवाणघेवाण यांसारख्या काही प्रमुख कारणांमुळे तत्कालिन मराठी भाषेतही कालांतराने अनेक चांगले वाईट बदल झाले. २० व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात प्रमुख बोलीभाषा असणारी मराठी भाषा आता मात्र जागतिकीकरणाच्या प्रचंड लाटेत कुठेतरी हरवताना दिसते आहे.
महाराष्ट्रात आजही मराठीच प्रमुख बोलीभाषा असली तरी ज्या वेगाने इंग्रजी व हिंदी भाषांचे प्रभुत्व जनमानसावर पडत आहे त्या वेगाने मराठीचा प्रसार व प्रचार होताना दिसत नाही, याला आपली शासकीय अन् सामाजिक धोरणे प्रामुख्याने जबाबदार आहेत.

समाजातील विविध स्तरांमध्येही जागतिकीकरणाचे अनेक चांगले-वाईट परिणाम झाले. लोकांच्या मानसिकतेत बदल होऊ लागले व मराठी बोलीभाषेवर प्रामुख्याने इंग्रजी व हिंदीचे अतिक्रमण झाले. परप्रांतियांचे वाढते लोंढे हे यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे काहींचे मत झाले. त्यावरुन राजकीय पक्षांनी राजकारण करण्याचाही प्रयत्न केला. एकंदरीत या सर्व प्रकारात हाती काहीच लागले नाही परंतु मराठीची गळचेपी मात्र झाली जी आजही अव्याहतपणे सुरु आहे.

प्रस्थापित राजकीय पक्षांचे सद्यस्थितीतले राजकीय धोरणही सध्या मराठीच्या भाषेच्या अध:पतनास कारणीभूत ठरत आहे, असं म्हटलं तर चुक ठरणार नाही. सरकारी मराठी शाळांमधील घसरणारी विद्यार्थ्यांची हजेरी असो किंवा मराठी शाळांच्या अनुदानाबाबतचे शासनाचे आडमुठे धोरण असो, या चुकीच्या धोरणांमुळे मराठी शाळांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने घटली व खासगी अन् विनाअनुदानित इंग्रजी व इतर माध्यमिक शाळांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली. परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. सरकारी शाळांचीही अनुदानाअभावी वानवा होत असल्याने मध्यमवर्गीय पालक मोठ्या प्रमाणात खासगी व विनाअनुदानित शाळांकडे वळले. एकंदरित सरकारच्या अयोग्य धोरणामुळे मराठीचे भविष्यच एका अर्थाने अंधारात गेले आहे.
आजकालची आमची तरुण पिढीसुद्धा मराठीच्या प्रसार आणि विकासाबाबत तितकीशी जागरुक दिसत नाही. मराठी म्हणजे ‘डाउन मार्केट’ असं बोलून मराठी भाषिकानांच आजही अनेक ठिकाणी हिणवलं जातं. अर्थात, याला अनेक सन्माननीय अपवादही आहेत, पण तेही विरळच !
एकीकडे संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे पुढारत चालले आहे, मात्र महाराष्ट्रातील मराठी भाषा मात्र राजाश्रय आणि लोकाश्रयाअभावी नामशेष होते कि काय, असे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात दिसत होते. त्यामुळे, २०२० मध्ये भारत महासत्ता जरुर बनेल आणि महाराष्ट्र देशातील एक प्रमुख राज्य असेल, पण महाराष्ट्रात मराठी भाषा मात्र नावापुरतीच उरली असेल अशी भीती काही वर्षांपूर्वी वाटायला लागली होती.
परंतु आता हळूहळू मराठी भाषिकांमध्येही आपल्या भाषेबद्दल अस्मिता जागायला सुरुवात झाली आहे. मराठी माणूस स्पर्धेच्या दुनियेत मागे कधीच नव्हता, मात्र आपल्या मातृभाषेची अस्मिता, तिच्याबद्दलचा जाज्वल्य अभिमान जपण्यात तो कुठेतरी कमी पडला. असे असले तरी आता चित्र बदलत आहे, अगदीच सकारात्मक नसले तरी आशावादी असायला नक्कीच वाव आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विवीध मेळावे, चर्चासत्रे यांमधून मराठीतून होणारा साहित्य, कला, विज्ञानादी विषयांचा प्रसार यांसारख्या कार्यक्रमामुळे मराठी भाषेला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. प्राचीन मराठी साहित्यावर सध्या संशोधन सुरु आहे व संशोधकांचे मराठी भाषेला एका अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करुन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे २०२० पर्यंत भारत विकसनशील देशांच्या गटातून विकसित देशांच्या गटात येईल की नाही माहित नाही. पण तोपर्यंत आपल्या प्रयत्नांनी आपण भारतीय संस्कृतीत मराठी भाषा व साहित्य अग्रस्थानी आणू, अशी आशा बाळगूयात ! जय महाराष्ट्र !
सागर उरगुंडे, एबीपी माझा, मुंबई

प्रथम सत्र परिक्षेच्या सराव प्रशनपत्रिकेसाठी खालील बटनाला क्लिक करा


( "E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा )
Click the button below to download PRITABLE WORKSHEET for all subjects from 1st to 8th standard.( इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा )
Maulana Abul Kalam Azad 11 November 1888(राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेबर 2017)
Children's Day : 14 November 2017(बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती)
Student day 7th November - Complete information (विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती)
Popular Posts
-
टार्गेट शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ - २३ सराव प्रश्न पत्रिका पेपर १ व २ ची संपूर्ण तयारी मागील वर्ष प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही शिष्यवृत्त...
-
शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील do...
-
प्रथम घटक चाचणी 2018 - 19 सराव प्रश्न पत्रिका नमस्कार शिक्षकवृंद, आपण सर्वांनी प्रथम घटक चाचणी च...
-
शिष्यवृत्ती परीक्षा 2017 -18 - वार्षिक नियोजन व सराव प्रश्नपत्रिका नमस्कार शिक्षकवृंद, कोणतेही काम नियोजनपूर्ण केल्यास यशस्वी ...
-
FIRST SEMESTER EXAM 2017 - 18 प्रथम सत्र परीक्षा 2017 - 18 (सराव प्रश्नपत्रिका व गुणदान तक्ते) ********************...
-
सावित्रीबाई फुले - बालिका दिवस विशेष 3 जानेवारी २०१८९ बालिका दिवस =================================== " लेक शिकवा अभियान...
-
नमस्कार शिक्षकवृंद, आज आपणासाठी घेऊन आलोय एक अस सॉफ्टवेअर जे आपले महत्वाचे काम काही मिनिटातच पूर्ण करेल.हो अगदी बरोबर पाठ टाचण आपोआप...
-
तयारी - प्रजासत्ताक दिवस/गणतंत्र दिवस/Republic day येणारा गणतंत्र दिवस हा चिरायू हो ह्या साठी आपणास तयारी करणे आवश्यक आहे.ह्या ठि...
-
प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 2021- सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक दरवर्षी प्रमाणे सर्व प्रश्नपत्रीकाच्या शोधात असतात. आम्ही...
-
मागील शैक्षणीक सत्रामध्ये आपण शिक्षणामध्ये झालेले बदल बघितले व आपल्या लक्ष्यात येत आहे की शिक्षणाची व्याख्या आता बदलत चालली आहे.आपणा...