फोल्डर लॉक शिका - अगदी सोप्या पद्धतीने(विना सॉफ्टवेअर)


नमस्कार शिक्षकवृंद,
"चला तंत्रस्नेही बनुया" या भागात आपले स्वागत आहे.आज मी आपणास संगणकामधील फोल्डर ला कुठल्याही सॉफ्टवेअर विना अगदी सोप्या पद्धतीने लॉक कसे करावे याचे थोडे प्रशिक्षण देणार आहे.

शिक्षक मित्रांनो आपण तंत्रस्नेही आहोत व आपल्या शाळेत किंवा आपल्या स्वतः कडे संगणक असतात.शाळेतील संगणक मध्ये आपण शाळेची महत्वाची माहितीचे संकलन करत असतो तसेच हे संगणक फक्त आपणच नाही तर इतर शाळेतील शिक्षक,कर्मचारी व कधी कधी मुले पण हाताळत असतात.अशा वेळेला कधी कधी आपण संकलित केलेली माहिती अकारण लुप्त पण होण्याची शक्यता असते.

स्वतः कडे असलेला लॅपटॉप किंवा सगणक मधील घरच्या व्यक्ती कडून हाताळणी होत असते व नकळत आपली माहिती लुफ्ट होऊ शकते.

ह्या सर्व समस्यांचे उपाय मला सुचले व मी फोल्डर लॉक करण्याविषयी माहिती गोळा केली त्या मधील मला आवडलेली सर्वात सोपी पद्धत मी आज आपणास सांगणार आहे -

"चला तर मग माहिती मिळवू या व तंत्रस्नेही बनून शाळा प्रगत करूया"


1.सर्व प्रथम आपल्या संगणकावरील डेस्कटॉप वर एक नवीन फोल्डर बनवून घ्या.त्याला लक्ष्यात येईल असे नाव द्या.नमुना खालील चित्रात दाखवला आहे.


2.आता तयार केलेले फोल्डर ओपन करा व mouse वरील RIGHT क्लीक करा व OPTION मधील TEXT DOCUMENTS नावाची फाईल निवडा.आता तुमच्या कडे एक नवीन फाईल तयार झाली आहे तिचे नाव new text documents असे असणार आहे आता ह्या फाईलला open करा .ओपन केल्यावर  text pad ओपन होईल.मदतीसाठी खालील चित्र बघा.


3.open झालेल्या note pad वरच आपल्याला महत्वाचे काम करायचे आहे.इथे आपणास एका सॉफ्टवेअर चे code पेस्ट करायचे आहे ते खाली मी दिले आहे.आपण कॉपी पेस्ट करू शकता.


cls
@echo off
title Folder Locker
IF EXIST “Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­­09D}” GOTO UNLOCK
IF NOT EXIST Locker GOTO MDLOCKER
echo Folder Created.
:CONFIRM
echo Are you sure you want to lock the folder? (Y/N)
set/p “cho=”
IF %cho%==Y GOTO LOCK
IF %cho%==y GOTO LOCK
IF %cho%==N GOTO END
IF %cho%==n GOTO END
echo Invalid Choice.
GOTO CONFIRM
:LOCK
ren Locker “Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­­09D}”
attrib +h +s “Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­­09D}”
echo Folder Locked.
GOTO END
:UNLOCK
echo Enter password to unlock the Folder :
set/p “pass=”
IF NOT %pass% ==
Your-Pasword-Here GOTO FAIL
attrib -h -s “Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­­09D}”
ren “Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­­09D}” Locker
echo Folder Unlocked Successfully.
GOTO END
:FAIL
echo Invalid Password!
GOTO END
:MDLOCKER
md Locker
echo Folder created.
GOTO END
:END
4.वरील code note pad मध्ये paste केल्यानंतर आपणास फाईल save करायची आहे ततपूर्वी वरील code बघा त्या मध्ये पिवळ्या कलरच्या पट्टीने highlight केलेल्या शब्दायेवजी आपणास पासवर्ड टाकायचे आहे.पासवर्ड हा आपणास वाटेल तो टाकावा. पासवर्ड टाकल्या नंतर फाईल save करायची आहे लक्ष्यात ठेवा आपणास ही फाईल फक्त save नाही,तर save as करायची आहे ते कसे खालील चित्र पाहा.

5.save As केल्यानंतर खालील window open होईल त्यामध्ये फाईल name मध्ये तुमहाला हवं ते नाव द्या व त्याखालील save as फाईल मध्ये All फाईल्स निवडा.
महत्वाचे - आपण जी फाईल name निवडले आहे तापुढे आपणास .bat अस लिहावयाच लागणार आहे.उदा.जर आपण आपण file name -  teacher अस द्यायाचं ठरवल असेल तर आपणास teacher अस नाव न देता teacher.bat  अस नाव देऊन फाईल save करावी लागेल. मदतीसाठी खालील दोन्ही चित्रे zoom करून बघा.

6.आता आपली फाईल save झाली आहे सर्व ओपन files close करा व डेस्कटॉप वरील तुह्मी बनवले फोल्डर open करा.open केल्या नंतर आपणास इथे दोन फाईल दिसतील 
1.text document file
2.तुह्मी save As करुन बनवलेली file
ह्या मधून तुह्मी text document file delete करू शकता.आता तुमच्या कडे एकच फाईल आहे तिला तुम्ही डबल क्लीक करा.आपोआप तिथे "locker" नावाचे फोल्डर दिसेल.खलील चित्र निरखून बघा.


7.Locker नावाच्या फोल्डर मध्ये तुम्हाला जी माहिती जातं करून ठेवायची आहे ती त्या मध्ये पेस्ट करून घ्या किंवा त्या मध्ये विविध फोल्डर बनवून माहिती जातं करा.परंतु आता प्रश्न येतो की हे फोल्डर लॉक कसे करावे त्या साठी locker फोल्डर च्या नावा खलील फोल्डर ला क्लीक करा.एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्या बॉक्स मध्ये लिहिले असेल की do you want to lock your file Y/N
इथे तुम्हला Y लिहा व enter बटन दाबा.तुमचे फोल्डर आपोआप गायब होऊन जाणार.म्हणजेच तुमचे फोल्डर safe झाले आहे .ह्या फोल्डरला कुणीच शोधू शकत नाही व बघू शकत नाही.
खलील चित्र निरखून बघा.

8.आता प्रश्न येतो आपले फोल्डर वापस कसे आणायचे?घाबरण्याचे करण नाही तुमची माहिती safe आहे.step क्र.7 मध्ये आपण ह्या फाईल वर क्लीक केले होते त्या फाईल वर परत क्लीक करा.नवीन डायलॉग बॉक्स open होईल आता इथे तुम्हाला पासवर्ड विचारेल तुह्मी स्टेप क्र.4 मध्ये जो पासवर्ड दिला आहे तो तंतोतंत तिथे type करा व enter बटन दाबा तुमचे फोल्डर परत वापस येईल .परत आपणास काही माहिती टाकायची असेल तर तिथे तुह्मी टाकू शकता.
खालील चित्र बघा.

धन्यवाद ! 

शंका व अडचण आल्या comment box मध्ये नक्की कळवा


Share:

3 comments:

  1. यात फक्त टेक्स्ट सेव करता येते की ऑडिओ विडिओ डेटा पण सेव करता येईल

    ReplyDelete
  2. सर्व काही save करता येत सर

    ReplyDelete
  3. Android मोबाइल साठी असे सॉफ्टवेअर सांगा

    ReplyDelete

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.