गुगल फॉर्म तयार करणे

     सध्याच्या युगात एखाद्या माहितीचे संकलन 
करण्यासाठी गुगल फाॅर्मचा फार उपयोग होतो. 
यामुळे माहिती जलदरित्या जमा होवून त्याचे 
संकलनही सहजरित्या होईल. 
   यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला
 पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल 
फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज
 आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे 
तयार करायचा हे शिकणार आहोत.

1.   गुगलफॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत 
महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते 
असले पाहिजे.

2.  युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने 
G- mail खाते Login करावे.

          


G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने 
हदाखविल्या प्रमाणे Google Drive  वर क्लिक 
करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये 
दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन 
होईल.

3. Google Drive ओपन झाल्यानंतर New  
वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील 
Google Form वर क्लिक करावे

        


4.  खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे 
Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. 
याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय 
टाईप केला आहे.




5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे  फॉर्म
 मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या 
प्रमाणे माहिती Edit  करावी. इमेज मध्ये बाणाने
 दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी 
Done वर क्लिक करावे.


6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते  4 थी पर्यंतच्या
 वर्गांची माहिती त्यात भरावी.




      वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने 
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी 
Send form  वर क्लिक करावे. 


7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील 
विंडो ओपन होईल. Link to Share या खाली
 आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती
 Copy करुन ठेवावी.   त्यानंतर  Done  वर 
क्लिक करावे.


8.  त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या 
प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात 
आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती 
इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण 
Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस 
अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो.
 इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा 
झालेली माहिती आपणास संंकलन होवून  
Excel फॉरमॅट मध्ये मिळते.



9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर 
करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक 
डिझाइन करु शकतो. 



           अशा प्रकारे गुगल फॉर्म ने माहीतीगोळा 
करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद 
होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस 
होतील  व मोठया प्रमाणात कागदाची बचत 
होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.  






3 comments:

  1. एकदम छान माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर
      Keep विसीटिंग

      Delete
  2. Nice and very important article.welldone

    ReplyDelete

Popular Posts

Popular Posts

Labels

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.