सरल महत्वाचे

*सरल महत्वाचे:*
*दिनांक : 10/10/2016*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
(खालील सूचनावजा पोस्ट मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार देण्यात येत आहे)

                    *सूचना 1 *


सर्व क्लस्टर लॉगिनला सुचित करण्यात येत आहे की,शाळेने त्यांच्या संच मान्यता पोर्टल मधून  finalized केलेल्या स्क्रीन cluster संच मान्यता लॉगिन मधून finalized करण्याची सुविधा आज देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्व क्लस्टरने आपली अंतिम मुदत बघता त्वरित आपले काम पूर्ण करावे.


                    *सूचना 2*


काही तांत्रिक अडचणीमुळे  क्लस्टर लॉगिन उशिरा उपलब्ध करून दिल्याने पुणे,मुंबई,नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी संच मान्यतासाठीची मुदत दिनांक 12/10/2016 वार बुधवार दुपारी 1 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.त्यानंतर पुणे,नागपूर आणि मुंबई विभागातील शाळा आणि क्लस्टर लॉगिन साठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.तसेच उद्या दिनांक 11/10/2016 ते 14/10/2016 या मुदतीत नाशिक, औरंगाबाद या विभागातील जिल्ह्यांसाठी संच मान्यता पोर्टल लॉगिन उपलब्ध करून देण्यात येईल हे लक्षात घ्यावे.

                       *सूचना 3*


शाळेने finalized केलेली माहिती क्लस्टर ने वेरीफाय करताना सदर माहिती अचूक असेल तर त्वरित finalized करावी.शाळेने चुकीची माहिती भरून finalized केलेली असेल तर सदरU माहिती क्लस्टर ने finalized करू नये.क्लस्टर लेवल ला रिटर्न ची सुविधा देण्यात आलेली नसल्याने शाळेनी आपली माहिती भरताना खूप काळजी घ्यावी.जर क्लस्टर च्या लक्षात आले की एखाद्या शाळेची माहिती चुकलेली आहे तर अशा शाळेची माहिती त्यांनी finalized करू नये.चुकीची माहिती भरणाऱ्या शाळांसाठी काय करायचे याबाबत सविस्तर सूचना आपणास देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
                    *सूचना 4*

क्लस्टर लेवल मधून finalized केलेली माहिती संच मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला जाते आणि क्लस्टर ने finalized केलेली माहिती रिटर्न करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी लॉगिन देखील उपलब्ध करून दिलेली नसल्याने क्लस्टर ने प्रत्येक शाळेची माहिती खात्री करूनच finalized करावी.

                  *सूचना 5*


संच मान्यता पोर्टल मधून सध्या फक्त इयत्ता 1 ते 10 असणाऱ्या लोकल बॉडी आणि खाजगी (शिक्षण विभाग) व्यवस्थापन असणाऱ्या सर्व शाळानी (एकच udise परंतु अनेक व्यवस्थापन असनारी शाळा आणि Partially aided म्हणजेचअंशतः अनुदानीत असणाऱ्या शाळा वगळता) संच मान्यता पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे.

*लोकल बॉडी मध्ये येणाऱ्या शाळा*

जिल्हा परिषद (प्राथमिक)
जिल्हा परिषद (सेल्फ फंडेड)
कॅन्टोन्मेंट बोर्ड
म्युनिसिपल कॉर्पोशन
म्युनिसिपल कॉर्पोशन (सेल्फ फंडेड)
नगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत

*खाजगी (शिक्षण विभाग)व्यवस्थापन* 

खाजगी अनुदानित
खाजगी विनानुदानित
Vedik/sanskrit/Religious edu. Org
Self financed
Gram panchayat (aided)
Police welfare (unaided)

या सर्व प्रकारच्या 1 ते 10 वर्ग असणाऱ्या शाळांनी संच मान्यता पोर्टल मधून आपली माहिती भरावयाची आहे.

                     *सूचना 6*


एकच udise परंतु अनेक व्यवस्थापन असणारी शाळा आणि Partially aided म्हणजेच अंशतः अनुदानीत असणाऱ्या शाळा तसेच इतर व्यवस्थापनाच्या आणि वर्ग 10 च्या पुढच्या शाळांना यथावकाश लॉगिन देण्यात येईल याची 


                       *सूचना 7*


ज्या शाळा फक्त मुलांची अथवा मुलींची आहे पण संच मान्यताला पोर्टल मध्ये co education असे दिसून येत होते ही समस्यां सोडवण्यात आलेली आहे.जरी यापूर्वी शाळा finalized केलेली असेल तरी तो बदल finalized स्क्रीन मध्ये देखील झालेला आहे हे लक्षात घ्यावे त्यामुळे त्या विषयी अधिक काळजी करण्याची गरज नाही आहे.

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Popular Posts

Labels

Blog Archive

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.