सरल महत्वाचे

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *०४/१०/२०१६*
*(New update,Share to all)*


            *Student पोर्टल*

१) आजपासून एक *नविन सुविधा* सर्व शाळांसाठी देण्यात येणार आहे.पुढील सूचना काळजीपुर्वक वाचावी. student पोर्टल मध्ये ट्रान्स्फर,प्रमोशन या सुविधा उपलब्ध करून बरेच दिवस झालेले आहे परंतु निरीक्षणावरून असे लक्षात येत आहे की बऱ्याच शाळांनी अद्याप देखील आपली माहिती भरून पूर्ण केलेली नाही आहे.नविन शाळेने ट्रान्स्फर ची request पाठवून देखील बऱ्याच शाळा अद्यापदेखील सदर request approve करत नाही आहे.तसेच २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात मुलांना pramot करावयाचे काम देखील शाळांनी अपूर्ण ठेवले आहे.यासाठी आजपासून काम अपूर्ण असणाऱ्या शाळांना login केल्यानंतर आपल्या पेंडिंग कामाचा एक report स्क्रीन वर दाखविण्यात येणार आहे.या report मध्ये शाळेला त्यांचे कोणते काम अपूर्ण आहे हे दाखविण्यात येणार आहे. *सदर अपूर्ण काम पूर्ण केल्याशिवाय त्या शाळेला student पोर्टल मध्ये कोणतेही काम करता येणार नाही* .त्यामुळे यानंतर काम पूर्ण न करू शकणाऱ्या शाळांना आपले काम पूर्ण करावे लागणार आहे.सदर सुविधा अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या (प्रदीप भोसले,हवेली,पुणे)
 haveliedcation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.

२) बऱ्याच शाळांनी आपल्या शाळेत शिकण्यासाठी आलेल्या मुलांची ट्रान्स्फर request जुन्या शाळेस पाठवलेली आहे.परंतु जुन्या शाळेने सदर request approve न केल्याने बऱ्याच शाळांना ही मुले आपल्या शाळेत कशी नोंदवावी ही समस्या आहे.परंतु *आता जुन्या शाळेस सदर request approve अथवा reject केल्याशिवाय आपल्या शाळेचे काम करू दिले जाणार नाही* त्यामुळे सदर शाळा आपली request आता त्वरीत approve करणार आहे.जर एखाद्या शाळेने आपल्या शाळेतुन इतर शाळेत शिकण्यास गेलेल्या  मुलाची *request approve करण्याऐवजी reject केली तर अशा शाळेची नोंद वरिष्ठ लेवल ला होणार आहे*.आणि अशा शाळेवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.तसेच जुन्या शाळेने चुकून request reject केली तर अशा शाळेला नवीन शाळेने पुन्हा एकदा request पाठवायची आहे. *दिनांक ७ ऑक्टो २०१६ पर्यंत आपले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यायचे आहे.*

३) *आपली ट्रान्स्फर request जुन्या शाळेने approve केली नाही म्हणून अशा मुलांची नोंद new entry या सुविधेमधून करावयाची नाही आहे याची नोंद सर्व शाळांनी घ्यावी.जाणूनबुजून तसे केल्यास सदर मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाईल* याची नोंद घ्यावी.तसे केल्यास आपण केलेली new entry आणि system मध्ये मागील वर्षी झालेली entry अशा प्रकारे एकाच विद्यार्थ्यांची दोन वेळा नोंद झाल्याने duplication वाढणार आहे.अशा प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्याचे duplication होणार नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने विचार सुरु आहे.त्यामुळे माझी शिक्षक बांधवाना विनंती आहे की कृपया आपण आपली request  approve होण्याची वाट पहावी.आपली request नक्कीच approve होणार आहे कारण त्या शिवाय त्या शाळेची देखील संचमान्यता होणार नाही आहे.त्यामुळे कोणत्याही शाळेने अशा प्रकारे प्रकारे ट्रान्स्फर request पाठवलेल्या मुलांची new entry च्या माध्यमातून नोंद करून घेऊ नये.गटशिक्षणाधिकारी यांनी कोणत्याही शाळेला अशा प्रकारे नोंद करून देऊ नये व या बाबतीत सविस्तर सुचना द्याव्यात.अशी सुचना या post द्वारे मा.डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नस,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात येत आहे.

४) ज्या शाळांनी वर सांगितल्या प्रमाणे ट्रान्स्फर request approve होत नाही म्हणून new entry म्हणून विद्यार्थी नोंद केली आहे आणि आता त्या विद्यार्थीची request जुन्या शाळेकडून approve होऊन updation साठी नविन शाळेला आलेली आहे,अशा वेळी नेमके काय करावे अशी समस्या अशा शाळेला पडलेली आहे.अशा शाळांना स्पष्ट सुचना देण्यात येत आहे की request approve होऊन आलेला मुलगाच आपणास system मध्ये ठेवायचा आहे आणि आपण जो new entry म्हणून भरलेला विद्यार्थी system मधुन कमी करावयाचा आहे याची नोंद घ्यावी.यासाठी ट्रान्स्फर होऊन आलेला विद्यार्थी हा update करून घ्यावा.update करताना सदर विद्यार्थ्याला मुळ रजिस्टर नंबर टाकल्यास ती नोंद update होणार नाही.कारण तो रजिस्टर नंबर आगोदरच आपण system मध्ये new entry द्वारे भरलेल्या मुलास नोंद करताना दिलेला आहे.म्हणून ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलाला update करताना आपण कोणतातरी नंबर रजिस्टर नंबर म्हणून द्या,उदा. १२३,४५६ अशा कोणताही दिला तरी चालेल.अशा प्रकारे सदर मुलाची नोंद आपण update करून घ्यावी.आता एकाच मुलाची दोन वेळा नोंद आपल्या शाळेत असल्याची आपणास दिसून येईल.यानंतर आपण duplication या tab चा वापर करून सदर विद्यार्थ्याच्या झालेल्या नोंदी पैकी new entry म्हणून भरलेल्या मुलाची नोंद delete करावी.तसेच जर duplication सुविधेचा वापर करून देखील सदर विद्यार्थी त्यामध्ये दिसून आला नाही तर अशा विद्यार्थ्यास तुकडी ट्रान्स्फर सुविधेमधून not known तुकडीमध्ये ट्रान्स्फर करून घ्यावे.कारण not known तुकडीमधील विद्यार्थी हे संच मान्यता मध्ये गृहीत धरली जानार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.याठिकाणी या केस मध्ये एक बाब लक्षात घ्यावी की कोणत्याही परिस्थितीत ट्रान्स्फर होऊन आलेल्या विद्यार्थ्यास system ला ठेवायचे आहे आणि ट्रान्स्फर न करता new entry म्हणून भरलेला विद्यार्थी हा संच मान्यता मध्ये येता कामा नये.तसेच चुकीच्या रजिस्टर नंबर ने update केलेल्या विद्यार्थयांचा रजिस्टर नंबर दूरस्थ करण्याची सुविधा यथावकाश देण्यात येणार आहे,त्यामुळे चुकलेल्या रजिस्टर नंबरची काळजी आपण सध्या करू नये.

५)  *out of school* या सुविधेचा वापर करताना एक महत्वाची बाब लक्षात घ्यावी की ज्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपणास नक्की माहिती असेल तरच त्या विद्यार्थ्यास दिलेल्या कारणाना select करून out of school करावे अन्यथा करू नये.ज्या मुलांच्या बाबतीत मुल कोठे गेले आहे या बाबतीत आपणास माहिती नसेल अशा मुलांना *not known* या तुकडीमध्ये तात्पुरते ट्रान्स्फर करावे.म्हणजे ते मुल या वर्षीच्या संच मान्यतामध्ये येणार नाही.या सुचानाचे सर्व शाळांनी पालन करावे.

६) *संच मान्यता tab विषयी* :

या tab मध्ये दिसून येणारा report हा संच मान्यतेसाठी अंतिम समजला जाणार आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.या tab मध्ये मुख्याध्यापकाना दाखवण्यात आलेली  पटसंख्या चेक करावी आणि काही बदल करायचा असेल तर तो करून घ्यावा.आपण ट्रान्स्फर,प्रमोशन,new entry अशा वेगवेगळ्या सुवेधेमधून आपल्या पटामध्ये केलेला बदल या संच मान्यता report मध्ये तात्काळ दिसून येतो.दिनांक ७ ऑक्टो २०१६ ला रात्री १२ वाजता ही माहिती cluster login ला verification साठी system द्वारे पाठवली जाणार आहे.त्यानंतर आपणास या माहितीमध्ये कोणताही बदल करून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

७)  *pramotion of १० या tab विषयी* :

 maintenance  या tab मध्ये pramotion of १० ही tab देण्यात आलेली आहे.ज्या शाळेतील १० वीचे विद्यार्थी same school मध्ये pramot करावयाची होती परंतु चुकून ती मुले प्रमोट करताना different school या option मधून pramot झाली आहेत.परंतु अशाने ती मुले ११ विला दिसत नाही आहे किंवा त्या मुलांना आता आपल्या शाळेतील ११ वी ला घेणे शक्य होत नाही आहे. अशा मुलांचे प्रमोशन आपल्या शाळेतील ११ वी ला करण्यासाठी सदर सुविधा या tab द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  
तसेच एखाद्या शाळेतील मुलगा ११ वी साठी इतर शाळेत जाण्यासाठी दाखला घेऊन गेला परंतु त्याची student पोर्टलमध्ये online ट्रान्स्फर  अद्याप झालेली नाही आहे आणि पुन्हा काही दिवसाने तो आपल्या शाळेत परत आला अशा मुलांचे प्रमोशन आपल्या शाळेतील ११ वी ला करण्यासाठी सदर सुविधा या tab द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या व इतर सर्व सुविधेचा वापर कसा करावा यासाठी सविस्तर माहिती माझ्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

८)  *change student division या tab विषयी :*

या tab चा वापर करून आपण विद्यार्थ्याची तुकडी change करू शकतो.विशेषतः काही विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहे परंतु आपणास त्या मुलाविषयी नक्की माहिती नाही आहे असे सर्व विद्यार्थी आपणास संच मान्यता मध्ये घेता येणार नाही म्हणून असे विद्यार्थी आपणास not known या तुकडीमध्ये ट्रान्स्फर करावे लागणार आहेत कारण जे विद्यार्थी not known मध्ये असणार आहेत असे विद्यार्थी संच मान्यता साठी घेतले जाणार नाही.(टीप : जे विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत परंतु आपणास माहिती आहे की कोठे आहे किंवा कोणत्या कारणास्तव शाळा सोडून गेले आहेत असे विद्यार्थी not known तुकडीत ट्रान्स्फर न करता out of school या सुविधेचा वापर करून आणि दिलेले कारण नमूद करून त्याना कॅटलॉग मधून बाहेर काढायचे आहे याची देखील नोंद घ्यावी.)
तसेच या सुविधेचा वापर आपणास तुकडी manage करण्यासाठी देखील होणार आहे याची नोंद घ्यावी.

९)  *Update Academic Year या tab विषयी :*

मागील वर्षी चे विद्यार्थी या वर्षी प्रमोट करताना बऱ्याच शाळांची माहिती चुकलेली दिसत आहे म्हणजेच बरेच मुले अद्याप देखील सं २०१५-१६ मध्ये  कॅटलॉग ला दिसत आहे. अशा सर्व इयत्तासाठी सदर मुले सन २०१५-१६ मधून सं २०१६-१७ मध्ये आणण्यासाठी सदर tab द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.जी मुले सं २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये दिसत नाही तोपर्यंत ती मुले २०१६-१७ साठी संच मान्यता साठी गृहीत धरण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

१०) *Attendance  या tab विषयी :*

सदर tab चा विचार सध्या कोणीही करू नये.या बाबत आपणास यथावकाश कळविण्यात येईल.सध्या फक्त संच माण्यातासाठी आवश्यक माहिती update करून घेण्याकडे लक्ष द्यावे.या tab बद्दल सध्या सोशल मेडीया मध्ये वेगवेगळ्या post येत असल्याचे दिसत आहे.अशा सर्वांना या post द्वारे मा.डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नस,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सूचित करण्यात येत आहे की अशा प्रकारे अधिकृत माहिती दिलेली नसताना चुकीचे माहिती पसरवू नये अन्यथा वरिष्ठ पातळीवर याची गंभीर नोंद घेण्यात येईल.तसेच सदर टॅब आज student पोर्टल मधून काढण्यात येईल.

११)  out of school या सुविधेमधून विद्यार्थी काढताना जर चुकून दुसरा मुलगा काढला गेला तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा आपल्या शाळेत दिसण्या करता उप्लब्ध करून द्यायचे  किंवा कसे याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार सुरु आहे.यामुळे कृपया सर्वांना विनंती आहे की आपण या सुविधेचा वापर करताना काळजी घ्यावी.system मधून out of school केलेला विद्यार्थी पुन्हा घेण्यासाठी technically खूप अडचण निर्माण होते याची नोंद सर्वांनी घ्यावी.

१२)एका शाळेने out of school केलेले विद्यार्थी हे दुसऱ्या शाळेस  ट्रान्स्फर request करण्यासाठी आजपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

        *MDM पोर्टल बाबत*

मागील काही दिवसांची विद्यार्थी माहिती MDM मध्ये भरावयाची राहिली असेल तर त्यासाठी मागील माहिती भरण्याची सुविधा ही *दिनांक ७ ऑक्टो २०१६ पर्यंत* वाढविण्यात आलेली आहे.त्यानंतर ही सुविधा बंद करण्यात येणार आहे आणि  या माहितीच्या आधारे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे बील online करण्यात येणार आहे,याची नोंद घ्यावी.त्या दृष्टीने आपण भरलेली माहिती ही अचूक आहे की किंवा नाही याचे शहानिशा करून घ्यावी.या सुविधेचा वापर करून आपण चुकलेली माहिती देखील दुरुस्थ करू शकाल.
तसेच opening balance भरताना आपण मायनस भरला असेल तर तो दुरुस्थ करून घ्यावा अशा प्रकारची चुकीची माहिती काही ठिकाणी पसरली असल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयास समजली आहे.तरी या post द्वारे *मा.श्री.वाघमोडे साहेब,MDM समन्वयक,पुणे* यांच्या सूचनेनुसार कळविण्यात येत आहे की अशी कोणतीही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही आहे.सर्वांनी सध्या आपली daily attendance अचूक भरावी.opening balance बाबत काही महत्वाचे निर्णय असल्यास आपणास योग्य वेळी योग्य अधिकृत सूचनेद्वारे कळविले जाईल.इतर माध्यमातून आलेल्या माहितीवर विसंबून राहून  काम करू नये,सदर माहितीची खातरजमा करावी आणि मगच विश्वास ठेवावा.अशामुळे आपल्या कामात चुका झाल्यास यासाठी संबंधित जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.चुकीच्या पद्धतीने माहिती पसरविणाऱ्याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
सरल विषयी आवश्यक माहितीसाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
*ब्लॉग चे नाव* : havelieducation.blogspot.in

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*

लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी
 *लिंक* :  
https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Popular Posts

Labels

Blog Archive

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation test link ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.